So Called Culture

#थोडसं मनातलं..... काल परवाच गणपती झाले, पुण्यात आल्यावर जर तू गणपती नाही बघितले तर काहीच नाही बघितले असं मित्राने सांगितल्या मुळे आम्ही बाहेर पडलो आमच्या अपार्टमेंच्या आसपास काही गणपती होते तिथे गेलो, एक 25-30 वर्षाच्या बाई त्यांच्या बाळा ला घेऊन उभ्या होत्या,देवापुढे हात जोडण्याची पद्धत त्यांना माहित नसेल कदाचित,त्या बाई त्यांच्या छोट्या बाळा ला फ्याइंग किस करायला शिकवत होत्या,हुशार ना माझं बाळ किस कर बेटा असं काहीतरी त्या बडबडत होत्या, आणि खरच त्या म्हणल्या तस बाळ चांगलं च हुशार होत लगेच शिकलं ते. कहर तर तेव्हा झाला जेव्हा बाळ गणपती ला फ्याइंग किस करत होत आणि त्या बाई अभिमानानें सर्वाना दाखवत होत्या ते सर्व.लहान मुलं निरागस असतात,आपली संस्कृती आपले संस्कार यांची त्या लहान मुलाला ओळख करून देणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे,हा आता संस्कृती म्हणून आपण जोपासत असलेल्या सगळ्या जुन्या गोष्टी चांगल्या आहेत अश्यातला मुळीच भाग नाही. थिएटर करत असल्या मुळे खूप सारा प्रवास घडतो वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक भेटतात, समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा यांचा इतका मोठा गंज आज लोक...