So Called Culture

#थोडसं मनातलं.....
काल परवाच गणपती झाले, पुण्यात आल्यावर जर तू गणपती  नाही बघितले तर काहीच नाही बघितले असं मित्राने सांगितल्या मुळे आम्ही बाहेर पडलो आमच्या अपार्टमेंच्या आसपास काही गणपती होते तिथे गेलो, एक 25-30 वर्षाच्या बाई त्यांच्या बाळा ला घेऊन उभ्या होत्या,देवापुढे हात जोडण्याची पद्धत त्यांना माहित नसेल कदाचित,त्या बाई त्यांच्या छोट्या बाळा ला फ्याइंग किस करायला शिकवत होत्या,हुशार ना माझं बाळ किस कर बेटा असं काहीतरी त्या बडबडत होत्या, आणि खरच त्या म्हणल्या तस बाळ चांगलं च हुशार होत लगेच शिकलं ते. कहर तर तेव्हा झाला जेव्हा बाळ गणपती ला फ्याइंग किस करत होत आणि त्या बाई अभिमानानें सर्वाना दाखवत होत्या ते सर्व.लहान मुलं निरागस असतात,आपली संस्कृती आपले संस्कार यांची त्या लहान मुलाला ओळख करून देणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे,हा आता संस्कृती म्हणून आपण जोपासत असलेल्या सगळ्या जुन्या गोष्टी चांगल्या आहेत अश्यातला मुळीच भाग नाही.
थिएटर करत असल्या मुळे खूप सारा प्रवास घडतो वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक भेटतात, समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा यांचा इतका मोठा गंज आज लोकांच्या बुद्धिमत्तेवर चडलाय कि प्रत्येकाला ते याच चष्म्यातून बघत असतात. डोळ्यावरच झापड काढण्याची यांची मुळी तयारीच नाहीय. आम्ही विचाराने मॉडर्न आहोत अस जगाला भासवण्यासाठी हे लोक नेहमी आव आणून वागतात. मी खूप शिकलेला आहे किंवा माझी वैचारिक पातळी जास्त आहे हे दाखवण्यासाठी जर कोणी त्याच्या शैक्षणिक पदव्या घेऊन फिरत असेल तर कस वाटेल आपल्याला...बरोबर आहे गंमतच वाटेल.
अरेंज मॅरेज हि पद्धत जरा कालबाह्य झालीय असं नाही का वाटत तुम्हाला मला तरी वाटत तसं, म्हणजे बघा ना अरेंज मॅरेज हि संकल्पना कोणी आणली,केव्हापासून सुरु आहे माहित नाही पण तेव्हाच काळ वेगळा होता, त्याकाळचे स्त्री,पुरूष आणि आत्ताचे स्त्री,पुरुष यांच्यात खूप फरक आहे.डोक्यावरचा पदर खाली न पडू देणाऱ्या स्त्रिया आणि परस्त्री मातेसमान मानणारे पुरुष अशी आपली संस्कृती होती पण आत्ता ची परिस्थिती वेगळी आहे,शहरातील कॉलेज ला जाणाऱ्या किंवा इतर मुलींना चार बॉयफ्रेंड्स आहेत असं ऐकल्यावर आज आपल्याला नवल वाटत नाही .तेव्हा मुलींना भीती वाटायची कि सासू कशी भेटेल आणि आता बायांना भीती वाटते कि सून कशी निघेल, मी बदलाच्या विरोधात नाही ,आयुष्य चांगलं बनवायचं तर बदल हा आवश्यकच आहे पण तो बदल सकारात्मक असायला हवा एवढच मला वाटत. .
देशात रोज स्त्री अत्याचारावर खूप साऱ्या बातम्या आपण वाचल्या, पाहिल्या त्यावर बरेच विवाद झाले,मग चूक कुणाची मुलाची कि मुलीची यावर मतभेद झाले पण मला न कळलेली गोष्ट अशी कि, जेव्हा एकाद्या मुलीवर बलात्कार होतो, आपल्या पैकी किती वडीलधारी लोक अशी आहेत जी त्या मुली ची सोयरिक आपल्या मुलाशी करतील किंवा किती मुलं अश्या पिडित मुलीशी लग्नाला तयार होतील?
संमती शिवाय केलेला शारीरिक अत्याचार अशी बलात्काराची व्याख्या आपण करतो, म्हणजे जी पीडित मुलगी याचा विरोध करते तिच्याशी लग्न करायला,तिला आदर द्यायला आपली संस्कृती नाही म्हणते आणि आरेंज मॅरेज साठी पाहिलेल्या मुली ने तिच्या चार बॉयफ्रेंड्स बरोबर सहमतीने तेच कार्य केले तिला आपण सन्मान देतो असं का? सभ्य मुलीची सहमती आपल्याला माहित होत नाही म्हणून कि पीडित मुलीचा विरोध जगाला कळलेला असतो म्हणून?

Comments

Popular posts from this blog

अवलिया