अवलिया
#थोडसं मनातलं...
आयुष्यात अचानक येणाऱ्या काही व्यक्ती आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात,असच काहीस आज घडल,उन्हाळ्यातील एका दुपारी मी सर्व कामे संपवुन अंगणात असलेल्या पेरू च्या झाडाखाली खुर्ची टाकून निवांत बसलो होतो.नुकतेच जेवण झाल्यामुळे आणि या शांत दुपारी झाडातून येणाऱ्या थंड हवेच्या झोता मुळे डोळे जड व्हायला सुरुवात झाली होती.आमच्या घराच्या अंगणात आईच्या हौसेमुळे आणि त्यामुळे वडिलांनी बळजबरीने लावलेली बरीच झाडे आहेत,वाहणारी हवा जेंव्हा झाडाच्या पानातून वाहत होती तेंव्हा त्यांचा सळसळ होणारा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता,एवढ्यात गेट ची कुंडी वाजवल्याच कानावर पडलं अश्या वेळी एवढ्या उन्हात कोण आलं तडफडायला अश्या भावनेने मी डोळे उघडले तर एका खांद्यावर वाजवायची पेटी आणि दुसऱ्या खांद्यावर गमछा व हातात कुबड्या घेऊन एक जण आमच्या गेट जवळ उभा होता,साधारण साडे पाच फूट उंची, फाटके पण स्वच्छ कपडे,डोक्याला लावलेलं तेल चेहऱ्यावर आल्यामुळं तेलकट झालेला सावळा चेहरा, खांद्यावरील पेटीवर एक जुना रुमाल बांधलेला त्यात दिवसभराच्या जेवणाची केलेली सोय,एका पायाने अधू असलेले ते बाबा गेट चा आधार घेत उभे होते. काय हवंय तुम्हाला अस विचारल तेव्हा त्यांनी वडीलाबद्दल विचारपूस केली,
मी त्यांना आत बोलावलं, पेटीच ओझ सांभाळत ते माझ्या मागे आले,मी त्यांना बसायला सांगितलं तर खाली फरशीवरच बसले,मी म्हणालो बाबा वर बसा तर म्हणे नको मी इथेच बसतो,वर बसलो तर पेटी वाजवता येणार नाही.पेटी....मी आश्चर्याने पाहत होतो मनात विचार आला की आता हा म्हातारा इथे पेटी वाजवणार की काय आणि एखाद्या जंगी गवयासारखे ते बसले पेटी च दर्शन घेतलं आणि पेटी वाजवायला सुरुवात केली.मी अवाक होऊन त्यांना ऐकत होतो पेटीचा आवाज ऐकुन घरातील सर्व बाहेर आले आणि मग त्यांनी गायला सुरुवात केली आणि पुढे 20 मिनिट मी वेगळ्याच दुनियेत होतो.
वडिलांकडून कळलं की 20-25 वर्षापूर्वी हे ''झोले बाबा" च्या यात्रेत गाडगे महाराजांचे अभंग,कीर्तन यांची स्पर्धा असे त्यात गायचे.त्यांचं गाणं ऐकण्यासाठी लोक यात्रेत गर्दी करायचे,गाणं म्हणताना त्यांचा असा काही सुर लागायचा की सर्व श्रोते भारावून जायचे.जोपर्यंत त्यांनी ती स्पर्धा केली प्रत्येक वेळी पहिल्या नंबर च बक्षीस घेऊनच ते परतले.अश्या अफलातून कलाकाराला आज उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरताना पाहून खूप वाईट वाटलं, एकेकाळी शेकडो लोकांना आपल्या आवाजाच्या जोरावर रात्रभर बांधून ठेवणारा ह्यांना पाच,दहा रुपया साठी अस भटकताना पाहिलं आणि कलाकार हा शापित असतो हे वाक्य खर वाटायला लागलं.मदत म्हणून आम्ही त्यांना जे पैसे दिले ते फार कमी आहेत पण ते पैसे त्यांचे काही दिवसांचे कष्ट कमी करतील ही आशा.
शिर्डी वाले साई बाबा हे गाणं त्यांनी ऐकवलं त्यातल्या काही ओळी जेव्हा ते गात होते तेव्हा त्या ओळी ते स्वतःसाठी म्हणताय अस वाटल.
लब पे दुआएँ आँखों में आँसू
दिल में उम्मीदें पर झोली खाली
ये ग़म की रातें ,रातें ये काली
इनको बना दे ईद और दीवाली
शिर्डी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली ।

Comments
Post a Comment